ग्रा. सावरगाव
मुखपृष्ठ
आमच्याबद्दल
इतिहास
ध्येयधोरण
प्रशासकीय संरचना
सेवासुविधा
सरकारी योजना
गॅलरी
गॅलरी
व्हिडीओ गॅलरी
उपयुक्त दुवे
उपयुक्त वेबसाईट
उपयुक्त नंबर्स
संपर्क
इतिहास
सावरगाव हे गाव तालुका मुख्यालयाच्या उत्तरेस वसलेले आहे, हे गाव पारनेर तालुका मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर आहे.या गावाच्या १.५ किमी अंतरावर नगर कल्याण हायवे असल्याकारणाने गावातील ग्रामस्थांस दळणवळण व्यवस्था सुसहाय झालेली आहे, गावात शेती व्यवसाय प्रमुख व्यवसाय आहे या गावांमध्ये सुंदर असे हनुमान मंदिर आहे. त्याची खूप मोठी आख्यायिका आहे, खूप मोठी यात्रा भरते, २ दिवस आमटी भाकरीचे सुग्रास जेवण असते, २५००० पेक्षा जास्त नागरिक या देवस्थानास भेट देतात, दर शनिवारी महाआरती होते व महाप्रसाद असतो त्यावेळी 200 नागरिक उपलब्ध असतात गावात महादेव मंदिर आहे
सावरगाव हे गाव सुजलम सुफलम आहे २०११ च्या जनगणनेनुसार सावरगावचे एकूण क्षेत्रफळ १९२१ हेक्टर असून गावची लोकसंख्या २४६७ आहे गावात पुरुष १२८४ असून महिला ११८३ आहे एकूण कुटुंब संख्या ४७५ आहे गावातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ८३ % पुरुष व ६५ टक्के महिला साक्षर आहेत शेती व्यवसायाला जोड म्हणून कुक्कुटपालन शेतीपालन दुग्ध व्यवसाय केले जातात.
गावाची सामान्य माहिती
एकूण लोकसंख्या
२४६७
पुरुष
१२८४
महिला
११८३
एकूण क्षेत्रफळ
१९२१
एकूण कुटुंब संख्या
४७५